breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खास आवाहन, म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येत असतात. राज ठाकरेंना मिठाई, पुष्पगुच्छसारखे असंख्य भेटी येतात. दरम्यान, यावरून राज ठाकरेंनी आपल्या कर्कर्त्यांना आवाहन केलं आहे.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात.

हेही वाचा – फाटलेला खिसा, रक्ताळलेले कपडे; एकांतात नेऊन मारहाण केल्याचा युवा वारकऱ्याचा आरोप

पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे. सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० ह्या वेळेत मी उपस्थित असेन.तेंव्हा भेटूया १४ जूनला, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button