breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘माझ्या हातामध्ये काही द्यायचे नाही, पण अपेक्षा माझ्याकडून फार ठेवायच्या’; राज ठाकरेंची टिप्पणी

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बॅडमिंटनपटूंना संबोधित केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण काढली. तसंच, याबरोबर त्यांनी राजकीय फटकेबाजीही केली. एकदा का माझ्या हातात सत्ता द्या, मग बघा मी कसं सगळं हाणतो, अशी टिप्पणी केली.

राज ठाकरे म्हणाले की, मला एका गोष्टीचं फार नवलं वाटतं की, माझ्या हातामध्ये काही द्यायचे नाही. पण अपेक्षा माझ्याकडून फार ठेवायच्या. एकदा हातामध्ये सगळ द्या म्हणजे बघा मी कसा हाणतो ते. हे राजकीय व्यासपीठ नाही. बॅडमिंटन या खेळावरती माझे नितांत प्रेम आहे. जवळपास १५ ते २० वर्षे मी बॅडमिंटन खेळलोय. एखादा ड्रग असावा त्याच अॅडिक्शन व्हावं. तशाप्रकारे मी बॅडमिंटन खेळायचो. सकाळी सहा किंवा साडेसहाला मी जायचो आणि अकरा-बाराच्या वेळेला मी बॅडमिंटन खेळून परत यायचो. नंतर माझं बॅडमिंटन थांबलं. नंतर मी टेनिस सुरु केलं.

हेही वाचा    –    ‘पद्मपुरस्कार, छत्रपती, अर्जुन अथवा क्रीडा पुरस्कारर्थीना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा’; पद्मश्री मुरलीकांत पेटकर 

एकदा अंगात वीकनेस असताना मी टेनिस खेळायला गेलो होतो. तिथे पडलो आणि हात फ्रॅक्चर झाला. टेनिस खेळून मला टेनिसएल्बो झाला होता. त्यानंतर हात माझा बरा झाला आणि कंबर दुखू लागली. मग डॉक्टरांनी सांगितले की, हिप रिप्लेसमेंट करावी लागेल. मग मला एकाने विचारले की, पूर्ण? मग मी त्याला उत्तर दिले की, अशी पर्ण होते का? असा शरीराचा भाग काढला दुसऱ्याचा लावला अस काही नसतं. त्याला हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय हे समजून सांगितलं. जवळपास दीड-पाऊणेदोन वर्ष मला कोणत्याही प्रकारचा व्यायाम करता येत नव्हता. मात्र, माझं पुन्हा एकदा टेनिस सुरु झालंय, असं राज ठाकरे म्हणाले.

मी पुण्यामध्ये बॅडमिंटनसाठी काय करु शकतो माहिती नाही. तुम्ही सांगवे. आपण ते निश्चित पुण्यासाठी करु. बॅडमिंटनसाठी मला जे जे करता येईल ते मी पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी नक्की करेन. कारण तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बॅडमिंटनला पुणागेम म्हणायचे, पण सध्या पुण्याचा काय गेम चालूय मला माहिती नाही आणि ज्यांचे गेम चालूयत त्यांना सांगण काही उपयोगाचं नाही. कारण दिसली जमीन की विक हे एकमेव धोरण घेऊन लोक पुढे जातात. त्यांना जर बॅडमिंटनचं मैदान दाखवलं. तर ही जमीन मोकळी का? असं ते विचारू शकतात. बॅडमिंटनपेक्षा कॅरम का नाही खेळत? हेही ते सुचवू शकतात, असंही राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button