‘फडणीस १०० वर्षाचे तरी ताठ उभे, सरकार वय नसताही वाकलंय’; राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

पुणे | ज्येष्ठ व्यंग चित्रकार शि.द.फडणीस यांच्या शंभरी निमित्ताने पुण्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच ताट पद्धतीने सरकार चालवा असा थेट सल्लाच राज ठाकरेंनी भर कार्यक्रमात दिला.
राज ठाकरे म्हणाले, चंद्रकांत पाटील म्हणाले चित्रकार फडणीस यांना काय घ्यायचे, मला असे वाटते तितक्या ताट पद्धतीने सरकार चालले तरी खूप आहे. कारण इतके वय नसताना सरकार वाकलेले आहे. या झाडाची फळे पाहिजे त्या झाडाची फळे पाहिजे असे करू नका असा थेट सल्लाच राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना दिला.
हेही वाचा – ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
शि.द. फडणीस सरांचे आडनाव फडणीस त्यांना ‘व’ ने वाचवले फडणीस म्हणून व्यंग चित्रकार झाले. फडणवीस असते तर व्यंग चित्र झाले असते. आर्टस स्कूल मध्ये असणाऱ्या डीनला साधे फूल सुद्धा काढता येत नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले अकादमी काढतो. पण तिथे शिकवणार कोण? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
शि.द.फडणीस आणि माझे वय जास्त असले तरी आम्ही दोघेही जे.जे.आर्टस ऑफ स्कूल मधून आलोय. फडणीस सरांचे चित्र काढण्याची कला अप्रतिम आहे. सरांनी एक व्यंग चित्राचा उल्लेख करण्यात आला जिथे मांजर आहे उंदीर आहेत आणि ते दोघे दूध पितायत, पण मी जर ते व्यंग चित्र काढत असेन तर मी व्यंग चित्र काढताना असे दाखवेल की मांजर मी कोणाच्या जातीच्या तो कोणाच्या जातीचा असा भंडत बसलाय आणि उंदीर दूध पिते. हा उंदीर म्हणजे आपला महाराष्ट्र असे, राज ठाकरे म्हणाले.





