आमदार अपात्रतेचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले..
![Rahul Narvekar said that MLA disqualification action should be taken as soon as possible](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Rahul-Narvekar-eknath-shinde-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. या घटनेला तीन महिने महिने उलटून गेले मात्र अज्ञाप या प्रकरणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यावरून स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी संपूर्ण कायदेशी प्रक्रियेचं पालन केलं जाईल. तसेच सर्व नियमांचं आणि सांवैधानिक तरतुदींचं पालन केलं जाईल. त्यानुसारच याप्रकरणी कारवाई होईल. ही कारवाई लवकरात लवकर पार पडेल. यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही.
हेही वाचा – मंत्रिमंडळ बैठकीत ९ निर्णय, महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
नार्वेकर यांना विचारण्यात आलं की आतापर्यंत काही आमदारांना बोलावून सुनावणी घेतली आहे का? त्यावर राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की अद्याप नाही, सुनावणीसंदर्भात काही ड्राफ्ट इश्यूजसह इतर तयारी सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष सुनावणी होईल.