‘खरा शिवसैनिक असे..’ शिवसेनेतील हकालपट्टीवरुन राहुल कलाटेंचं जोरदार प्रत्युत्तर
पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. ही निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि भाजपकडून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
चिंचवडमध्ये शिवसैनिकांकडून राहुल कलाटे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात येत आहे. एका पक्षाची उमेदवारी खोक्यातून, नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी एकदम ओक्के खोक्यातून, असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. यावर बोलताना खरा शिवसैनिक असे बॅनर लावू शकत नाही. चिंचवडची निवडणूक ही जनतेच्या मुख्य प्रश्वावरच व्हायला हवी, अशी भूमिका राहुल कलाटे यांनी मांडली आहे.
बॅनर लावण्याचा प्रकार हा महत्वाच्या प्रश्नांपासून लक्ष हटविण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. 2019 ला माझी शिवसेनेतून हकालपट्टी होणार अशा चर्चा होत्या. परंतू, अजूनपर्यंत झालेली नाही,असं राहुल कलाटे यांनी म्हटलेलं आहे.