breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘भाजप आणि राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू’; राहुल कलाटे

चिंचवडची जनता पोटनिवडणुकीत या दोनही पक्षाला त्यांची जागा दाखवेल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांचा कारभार बघितला आहे. हे दोनही पक्ष एकाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे चिंचवडची जनता पोटनिवडणुकीत या दोनही पक्षाला त्यांची जागा दाखवेल. मला नक्कीच साथ देईल आणि विधानसभेत पाठवेल, असा विश्वास अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

रहाटणीतील प्रचार सभेत जयंत पाटील यांनी अपक्ष उमेदवाराला भाजपनेच उभे केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना कलाटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच शपथविधी केला होता. पहाटेच्या शपथविधीमुळे भाजपच्या व फडणवीस यांच्या जवळ कोण आहेत, हे उभ्या महाराष्ट्राने बघितले. राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. महाविकास आघाडीकडून मी प्रबळ दावेदार असताना आणि मलाच उमेदवारी मिळावी अशी जनतेची भावना असतानाही राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिली नाही. उमेदवार ठरविण्यातही भाजपला सोईची भूमिका घेतल्याची चिंचवडच्या जनतेमध्ये जोरदार चर्चा आहे.

महापालिकेतील पाच वर्षातील भाजपा सत्ता काळातील भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीने कितीवेळा आवाज उठविला, कोणते प्रकरण तडीस लावले. एक-दोन ठेके मिळवून भाजपच्या भ्रष्टाचाराला साथ देण्याचे कामच स्वत:च्या पक्षाच्या नगरसेवकांनी केले. आता प्रदेशाध्यक्षही भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचे टाळतात. महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोलत नाहीत. त्याचे गुपित जनतेला माहिती आहे.

राष्ट्रवादी आणि भाजप हे दोनही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजु असल्याचे चिंचवडच्या जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत चिंचवडची जनता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षाला त्यांची जागा दाखवेल. मी चिंचवडकरांच्या स्वाभिमानीसाठी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button