राहुल गांधींकडून पुन्हा एकदा सावरकरांचा उल्लेख; म्हणाले, माझं नाव सावरकर नाही..
नरेंद्र मोदी यांचे अदांनीसोबत काय संबंध आहेत
दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. लोकसभा सचिवालयानं यासंबंधीत नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध केले आहे. यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
तुम्ही विदेशात केलेल्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी तुम्हाला माफी मागण्यास सांगितले, कोर्टात माफी मागण्यास सांगण्यात आले होते, तुम्ही याबाबत काय विचार करता असा प्रश्न पत्रकारांनी राहुल गांधी यांना विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले की, माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.
लोकशाहीवर हल्ला होत असून याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. नरेंद्र मोदी यांचे अदांनीसोबत काय संबंध आहेत आणि ते शेल कंपन्यांचे २०,००० कोटी कोणाचे आहेत? असा प्रश्न मी विचारला होता. तो पैसा अदांनीचा नाही, अन्य लोकांचा आहे. मग ते कुणाचे आहेत, असा प्रश्न मी केला. त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.