राहुल गांधी यांचा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप
मत चोरीप्रकरणात आदित्य ठाकरे केव्हा खुलासा करणार याची उत्सुकता

मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी गेल्या दोन पत्रकार परिषदेत याविषयीचे पुरावे सादर केले. तर लवकरच मत चोरी प्रकरणात हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचा त्यांचा दावा आहे. तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे हे सु्द्धा मत चोरीविरोधात आवाज उठवणार आहे. आपण मत चोरीप्रकरणात सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मुंबईत एका कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्यानंतर आपणही महाराष्ट्र विधानसभेतील मत चोरीबद्दल खुलासा करू असे आदित्य ठाकरे म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील मत चोरी प्रकरणात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे ते म्हणाले. आम्ही गेल्या निवडणुकीत मतदारांची अचानक वाढलेली संख्या, मतदार यादीतून गायब झालेले मतदार, मतदान केंद्रावरील अव्यवस्थेविषयी तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व अनियमिततेबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
कधी करणार खुलासा?
तर मत चोरीप्रकरणात आदित्य ठाकरे केव्हा खुलासा करणार याची उत्सुकता लागली आहे. ते कधी मत चोरीविषयीचा खुलासा करणार याविषयी त्यांना विचारण्यात आले. तेव्हा मत चोरीवर सर्जिकल स्ट्राईक होणार आहे. पण सध्या ती कधी करणार याचा त्यांनी खुलासा करणार नाही. त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी सुद्धा मत व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, या प्रक्रियेत आम्हाला अनेक त्रुटी आढळल्या. त्याविषयीचा अभ्यास सुरू आहे. लवकरच मत चोरीचा खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले. जनतेच्या दरबारात आमची बाजू मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब
राहुल गांधीं हे बिहार निवडणुकीपूर्वी हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची शक्यता आहे. त्यांनी मत चोरीविषयी आतापर्यंत दोन पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यात त्यांनी कर्नाटकमधील काही मतदार संघात मत चोरी झाल्याचा आरोप केला आहे. त्याविषयीचे खुलासेच नाही तर पुरावे पण त्यांनी सादर केले. या पुराव्या दाखल यावेळी तर त्यांनी काही मतदार सुद्धा समोर आणले. त्यांनी तक्रार केली नसतानाच शेजारच्या व्यक्तीचे नाव यादीतून वगळल्याचे त्यांनी समोर आणले होते. तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.