‘उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला’; रवींद्र धंगेकर
![Rabindra Dhangekar said that on the same day I got the nomination, my victory was confirmed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/ravindra-dhangekar-780x470.jpg)
कसब्यात सातवी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ३१९२ मतांनी आघाडीवर
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
मला उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता. प्रचार वगैरे औपचारिकता मला करावी लागली. मी सर्व जातीधर्माच्या भिंती तोडून काम केलं आहे. मी कधीच आलेल्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता विचारलेला नाही. माझा १५ हजार मतांनी विजय होईल, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
कसबा पेठ सातवी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर २३०८० मतांसह आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने २०३६३ आणि आनंद दवे १०० मते मिळाली आहेत. चिंचवडमध्ये सातवी फेरी अखेरीस अश्विनी जगताप २१२३७ मतांसह आघाडीवर आहेत. तर नाना काटे १७८३७ आणि राहुल कलाटे ७९०७ मते मिळाली आहेत.