‘का काढला आमच्याकडून कसबा…आम्ही दाबणार नोटा..’; पुण्यात बॅनरबाजी
![Pune Kasba Peth will teach a lesson on the by-election banner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Pune-Kasba-Peth-banner-780x470.jpg)
आमचे ही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा
पुणे : पुणे हे पाट्यांसाठी प्रसिद्ध आहे मात्र, आता पुण्यात बॅनरबाजी जोरदार सुरू आहे. भाजप दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचं निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. मात्र भाजपने टिळक घराण्यातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कसबा पेठेत अनोखे बॅनर लागले आहेत.
आमचे ही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा… कसबा हा गाडगीळांचा.. कसबा हा बापटांचा..कसबा हा टिळकांचा.. का काढला आमच्याकडून कसबा…आम्ही दाबणार नोटा..या आशयाचे बॅनर कसबा पेठेत लागले आहेत.
यापुर्वी कुलकर्णीचा मतदारसंघ गेला..टिळकांचा मतदारसंघ गेला..आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?, अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले होते.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये जगताप कुटुंबीयांना जो न्याय देण्यात आला, तो न्याय टिळकांच्या घराला कसब्यामध्ये का देता आला नाही? पुणे जिल्ह्यात २१ आमदार असताना प्रत्येक समाजाचं चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाला का डावललं गेलं? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-13.png)