पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा : मोहन जोशी यांच्यासह पुणे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींची पोलीसांकडून धरपकड
![Prime Minister, Narendra Modi, Pune Tour, Mohan Joshi, Pune, City, Congress, Nationalist, Congress, Associations, Representatives, Police, Protest,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/modi-Mohan-joshi-areested-780x470.png)
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याला पुणे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींनी विरोध दर्शविला असून, मंडई चौकात आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात येत आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीसांकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौर्यावर येत आहेत. ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात ११ वाजता जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध होत आहे.
मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी आंदोलन करण्यात येऊ, यासाठी पुणे पोलीसांकडून अनेकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील विरोध आंदोलनावर ठाम आहेत. काळे झेंडे आणि घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून कऱण्यात येत आहे. त्यामुळे पुणे पोलीसांकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत आहे. यावेळी मोहन जोशी यांच्यासह अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.