breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोहगाव विमानतळावर आगमन; काही क्षणातच देहूत दाखल होणार

पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे. लोहगाव येथील विमानतळावर मोदी दाखल झाले आहेत. श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येत आहेत. काही वेळातच मोदी देहूत दाखल होणार आहेत. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरव राव, जगदीश मुळीक, स्वागतासाठी हजर होते.

श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येत आहेत. लोकार्पणानंतर माळवाडी येथे संवाद सभा होईल. दुपारी ३ वाजेपर्यंत ते देहूत असणार आहेत. दरम्यान श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. या कार्यक्रमाची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. संवाद सभेसाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पावलोपावली खडा पहारा दिसून येत आहे. परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. मुख्य देऊळवाड्याला फुलांची सजावट केली आहे. मुख्य मंदिरात आगमन होताना चारशे वारकरी त्यांचे स्वागत करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button