पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर; ३८ हजार ८०० कोटी रूपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन
![Prime Minister Narendra Modi inaugurated projects worth 38 thousand 800 crore rupees during his visit to Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/narendra-modi-1-780x470.jpg)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईचा चेहरामोहरा बदलणाऱ्या एकूण ३८ हजार ८०० कोटी रूपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ च्या सुमारास मुंबईत दाखल होणार आहेत. ते नव्या मुंबई मेट्रो लाईन २A आणि ७ चे उद्घाटन करणार आहेत. हा मेट्रो मार्ग सुमारे १२,६०० कोटी रूपयांचा प्रकल्प आहे. तसेच मुबईतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे पंतप्रधान भूमिपूजन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये ट्विट करत ही माहिती दिली आहे. ” मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल, असं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदीच्या हस्ते दहिसर ई आणि डीएन नगरला जोडणारी मेट्रो लाईन 2A अंदाजे १८ किमी लांब आहे. तर अंधेरी ई-दहिसर ई ला जोडणारी मेट्रो लाईन ७ अंदाजे १६ किमी लांब आहे. या ओळींची पायाभरणीही २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी केली होती. या मेट्रो ट्रेन मेड इन इंडिया आहेत.