breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

२ मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याची तयारी, शिवसेना शिंदे गटाच्या गोटातली बातमी

मुंबई : . महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांकडून वेगवेगळ्या जागांवर दावा केला जातोय. देशाची लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात सध्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. तर सत्तेत सध्या ३ महत्त्वाचे पक्ष आहेत. त्यामुळे या जागावाटपाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. असं असताना आता शिंदे गटाच्या गोटातली लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचा लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ जागांवर दावा आहे. शिंदे गट लवकरच १८ जागांचा प्रस्ताव पाठवणार आहे. तसेच शिंदे गट महाराष्ट्र मंत्रिमंडळातील २ मंत्र्यांना थेट लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक आणखी रंजक होण्याची चिन्हं दिसत आहेत.

शिंदे गट लोकसभेसाठी १८ जागांचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गट २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर जिंकलेल्या १८ जागांवर दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शिंदे गट २ मंत्र्यांना लोकसभेत उतरवण्याच्या तयारीत आहे, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे, धाराशीवमधून मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. संदीपान भुमरे हे सध्या राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री आहेत. तर तानाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांना आता लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदे गटाकडून चाचपणी सुरु आहे.

हेही वाचा – व्यक्तीविशेष: ‘संयम, संघटन, संस्कार’ हीच वाघेरे पाटलांची जमेची त्रिसूत्री!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना १८ जागांवर ठाम आहे. शिंदे गट महायुतीत १८ जागांचा लवकरच प्रस्ताव देणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडच्या १३ खासदारांसह ५ विनिंग जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशीव लोकसभा मतदारसंघांवर शिवसेना दावा करणार आहे. शिंदेंची शिवसेना दक्षिण मुंबई, सिंधुदुर्ग –रत्नागिरी, परभणी जागेवरही दावा करणार आहे. आमच्या ५ विनिंग जागा असल्याचा शिवसेनेचा दावा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशीवमधून तानाजी सावंत यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. तर संभाजी नगरातून संदीपान भुमरेंच्या नावाची चाचपणी आहे. शिंदे गटाची पाचही ठिकाणी ठाकरे गटाविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी आहे. शिंदे गटाकडून संभाजीनगर, धाराशीव मतदारसंघात खासगीत सर्व्हे करण्यात आलाय. तर परभणीतून अर्जुन खोतकरांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. दक्षिण मुंबई, सिंधुदुर्ग – रत्नागिरीत लोकांची मतं जाणून घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button