‘प्रवीण दरेकरांनी मराठा समाजाचा अपमान केलाय, आता…’; मनोज जरांगे कडाडले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-17-1-780x470.jpg)
Manoj Jarange : प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाचा अपमान केलाय, आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू असं म्हणत मनोज जरांगेयांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर सडकून टीका केलीये. जालन्यातील अंतरवली सराटी येथे आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरु आहेत. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलटवार होत आहेत. काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर खोचक टीका केली होती. आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात, सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत, असा इशाराच जरांगेंना दिला आहे. यावर आज मनोज जरांगे चांगलेच संतापले असून पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचं दिसतंय.
हेही वाचा – Ground Report । खासदार अमोल कोल्हे यांनी भर व्यासपीठावर ‘‘टीम-गव्हाणे’’चा केला पाणउतारा!
दरेकर माझ्या भोवती असणाऱ्या मराठ्यांना आमिष दाखवत फोडत आहे. माझ्या विरोधात बोलायला लावत आहे. दरेकर वाटोळं करणारा माणूस आहे. देवेंद्र फडणवीस बस म्हणल तिथं बस म्हणणारा माणूस आहे.त्याला मराठ्यांविषयी काही देणंघेणं नाही. काल ते लेकरू रडलं ते भंपकपणा वाटतं असं म्हणत मराठा समाजाचा अपमान केला आहे. जातीत गद्दार आहेत. जे नाही ते खोटं बोलायला आहे. असं म्हणत मनोज जरांगे यांनी आमदार प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल केला.
मुलीच्या डोळ्यातलं पाणी भंपकपणा म्हणाले का तुम्ही असं म्हणत एका आमदारकीचा माज दाखवू नको, इतकी सत्तेची, आमदारकीची मग्रूरी का? असा सवाल करत वेळ आली तर एकवेळ मराठे शिंदेंचे, पवारांचे, महाविकास आघाडीचे नेते निवडून आणतील आणि तुझेच पाडतील असे मनोज जरांगे म्हणाले. तुमच्याच नेत्यांकडून तुमचाच सुपडासाफ होणार असल्याचं तुमच्याच बैठकीत ठरलंय. भंपकपणा म्हणजे, मुलींच्या डोळ्यातील पाण्याला भंपक म्हणत आहेत. दरेकरांनी मराठा समाजाचा अपमान केलाय. आता गर्दी काय असते आता आम्ही तुम्हाला मुंबईत दाखवू असा इशारा मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकरांना दिलाय.