ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूरमध्ये दंगल घडविण्याचा प्लॅन

खासदार प्रणिती शिंदेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तोफ डागली

मुंबई : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता.लोकसभेच्या मतदानाआधी दोन दिवस दंगल घडवणार होते, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत शाब्दिक दंगल घडणार हे निश्चित आहे.

भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात बोलताना खासदार शिंदे यांनी भाजपवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. ही लोकं रक्ताने राजकारण करतात. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे, असा हल्लाबोल खासदार शिंदे यांनी केला. या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी यावेळी भाजपचे जे आमदार मतदारसंघात फिरले नाही, त्यांचे आभार मानले.

त्यांचा होता दंगल घडविण्याचा प्लॅन त्यावेळेस ते गावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, असा आरोप त्यांनी फडणवीस यांच्यावर केला. ते कानात सांगितलं गेलं होतं.मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं. सीपीनी सांगितलं होतं जा बाहेर नाहीतर उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं.त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, असे शिंदे म्हणाल्या.

मग भाजप आणि दहशतवाद्यात काय अंतर?

संविधान संपविण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने चपराक लावली. भाजप आणि दहशतवाद्यांमध्ये काय फरक आहे? हे देशात राहून भांडण लावत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सोलापुरात दंगली घडविण्याची योजना होती. भाजपने किती पैसे वाटप केले. एक साडी आणि 500 रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे दिले तरी तुम्ही त्यांना मतदान केले नाही, असे त्या सभेला उद्देशून म्हणाल्या. त्यांच्या आरोपाने आता एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button