बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
![Prakash Ambedkar's appeal on the backdrop of Babasaheb Ambedkar Jayanti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/prakash-ambedkar-on-parambir-singh-letter.jpg)
पुणे |
करोना संक्रमण वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून आदेश लागू झाले असून, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. याच कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही असून, तो मुद्दा उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध असणार आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं आहे. “महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
महाराष्ट्र शासनाने पुन्हा लॉकडाऊन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते, त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा. pic.twitter.com/ULCuJjiljR
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 5, 2021
वाचा- टोला लगावल्यानंतरही आनंद महिंद्रांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार; म्हणाले…