‘शरद पवार आणि अजित पवार भेट हा खेळीचा भाग’; प्रकाश आंबेडकर यांचं विधान
![Prakash Ambedkar said Sharad Pawar and Ajit Pawar meeting is part of the game](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/prakash-ambedkar-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार गटातील नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि आदिती तटकरे हे नेते उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पुन्हा भाजपचं सरकार आलं पाहिजे, अशा रितीनं अजितदादांची खेळी आहे. अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यात प्रयत्न केला जातोय. शरद पवार यांना भेटले हा देखील खेळीचा भाग मानतो.
हेही वाचा – मुंबईच्या मार्वे बीचवर पाच मुले बुडाली, दोघांना वाचविण्यात यश, नौदलाची शोध मोहीम सुरू
अजित पवार आणि भजपबरोबर गेलेले नेते परत यावे यासाठी ते काम करणार त्यामुळे पवारांची भेट घेणे भेटणे स्वाभाविक आहे. विरोधी पक्षांची १८ तारखेला बैठक आहे. शरद पवार यांची भूमिका काय आहे त्याबाबत तेव्हा चित्र स्पष्ट होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.