breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

RSS च्या नेत्यांचा हाफ चड्डीमधील फोटो पोस्ट करत प्रियंका गांधी म्हणाल्या, “अरे देवा…”

उत्तराखंड | 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. रावत यांच्या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात असतानाच काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही या वादामध्ये उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट करत यांचेही गुडघे दिसत आहेत असा टोला लगावलेला आहे.

“अरे देवा, त्यांचे गुडघे दिसत आहेत,” अशा कॅप्शनसहीत प्रियंका यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या फोटोंचं कोलाज आहे. या फोटोंमध्ये हे सर्व वरिष्ठ नेते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत असून त्यांनी संघाचा पोशाख म्हणजेच अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट घातलेली दिसत आहे. रावत यांनी गुडघे दिसणाऱ्या महिलांसंदर्भात वक्तव्य केल्याने त्याचा आधार घेत प्रियंका यांनी या वरिष्ठ नेत्यांचेही गुडघे दिसत होते असा टोला लगावला आहे.

रावत काय म्हणाले होते?

एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारला पालक जबाबदार असतात, असंही ते म्हणाले.

रावत यांनी सांगितला तो अनुभव…

मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला होता. “एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते,” असं रावत म्हणाले. पुढे बोलताना रावत म्हणाले,”माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि गुडघे दिसणारी फाटलेली जीन्स घालून फिरते,अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले होते.

वाचा- वाझे प्रकरण सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड; संजय निरुपमांचा गंभीर आरोप

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button