breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत २५ जागांवर आरपीआयचा दावा : रामदास आठवले

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आरपीआय (आठवले गट) भाजपसोबत युती करेल. मात्र, ३९ जागांवर आरपीआयचा दावा असणार आहे. कमीत कमी २५ जागा आरपीआयला मिळतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
पिंपरी येथील हॉटेल कलासागर येथे सोमवारी झालेल्या आरपीआय महिला आघाडीच्या बैठकीनंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात दलितांची संख्या लक्षणीय आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आरपीआयचे उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर लढले होते. आरपीआयचा वेगळा गट स्थापन केला होता. शिवाय आरपीआयला वेगळे कार्यालयदेखील मिळाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button