राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारी समिती जाहीर, पाहा कोणाला मिळालं स्थान?
![Pimpri-Chinchwad city executive of NCP announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Pimpri-Chinchwad-NCP-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिचंवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये ९ जणांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी समिती आज जाहीर केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य पुढे निरंतर सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्या कामकाजासाठी कार्यकारी समिती जाहीर केली आहे.
हेही वाचा – नीलन गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करा; ठाकरे गटाची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी आज जाहीर केली. या कार्यकारिणीवर श्री. सुनिल विजय गव्हाणे, श्री. इम्रान युनूस शेख, श्री. काशिनाथ… pic.twitter.com/WCIKcThzwJ
— NCP (@NCPspeaks) July 17, 2023
या कार्यकारिणीवर सुनिल विजय गव्हाणे, इम्रान युनूस शेख, काशिनाथ संभाजी जगताप, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, देवेंद्र सहदेव तायडे, मयूर भरत जाधव, काशिनाथ विठ्ठलराव नखाते, राजन गोपाळकृष्णन नायर, शिलाताई संदीप भोंडवे या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.