breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

व्यक्तीविशेष : पिंपरी-चिंचवड भाजपाचा कुशल संघटक : अमोल थोरात

स्मार्ट सिटी… च्या दिशेने वाटचाल करणारे पिंपरी-चिंचवड शहर अर्थात आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका. महाराष्ट्राचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक माहेरघर म्हणून पुणे विकसित झाले. तसेच, महाराष्ट्राची औद्योगिक आणि आयटी हब म्हणून पिंपरी-चिंचवड प्रगतीपथावर आहे, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. या प्रगतीमध्ये अनेक कर्तुत्वसंपन्न नेते, सामाजिक कार्यकर्ते यांचे योगदान आहे. असाच नव्‍या पिढीचा युवा शिलेदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अनेकांचे योगदान आहे. स्व. अण्णासाहेब मगर यांच्यापासून सुरू झालेल्या शहराच्या नेतृत्वाचा वेलू आता आमदार लक्ष्मण जगताप- महेश लांडगे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. यापुढील काळात ही धुरा अमोल थोरात यांच्यासारख्या नव्या दमाच्या शिलेदारांवर राहणार आहे.

शहरातील भाजपाची वाटचाल कशी झाली? यावर दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येते की, अवघे ३ नगरसेवक असलेला हा पक्ष शहरातील बलाढ्य सत्ताधारी बनला. आजच्या घडीला शहरात पक्षाकडे दोन विधानसभा आमदार, १ विधान परिषद आमदार आणि ७७ नगरसेवकांची ताकद आहे. एकेकाळ प्रचंड शक्तीशाली असलेल्या राष्ट्रवादीला पराभूत करणे निश्चितच सोपे नव्हते. ३ चे ७७ नगरसेवक होण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यासाठी सुरूवातीपासून भाजपाचा झेंडा खांद्यावर ज्या काही मोजक्या लोकांनी घेतला. त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. त्यामुळेच भाजपाला आज विजयाची फळे चाखण्याची संधी मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जगातील बलाढ्य सत्ताधीश असले, तरी त्यांची खरी ताकद भाजपाच्या निष्ठवंत कार्यकर्त्यांमध्ये आहे, ही बाब अनेकदा या प्रभावी नेत्यांनी जाहीरपणे मान्य केली. असाच… कट्टर, निष्ठावंत आणि प्रखर राष्ट्रप्रेमी युवा चेहरा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे तो म्हणजे संघटन सरचिटणीस अमोल थोरात.

शहर भाजपाचे अभ्यासू व्यक्तीमत्व…

एक सयंमी, शांत आणि आभ्यासू असे व्यक्तीमत्व म्हणून अमोल थोरात यांची भाजपासह राजकीय वर्तुळात ओळख आहे. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले, पण मनात जर जिद्द असेल तर माणूस कोणतेही कष्ट करण्यास तयार असतो, असेच काहीशे अमोल थोरातांच्या बाबतीत घडले. ते स्वतः उच्चशिक्षीत तर आहेतच, परंतु त्यांनी इतरांनाही शिक्षणाची प्रेरणा दिली. त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर केले. पण बालपणापासून स्वयंसेवक संघाची शिकवण त्यांच्या अंगी असल्यामुळे त्यांनी समाज कार्यात स्वतःला वाहून घेतले. भाजपाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते झाले.

उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचा विश्वासू युवा नेता…

अमोल थोरात हे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे खास विश्‍वासू त्यामुळे त्यांनी आजपर्यंत टाकलेल्या जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. संघटन सरचिटणीस म्हणून त्यांनी तीन टर्म तसेच सहा वर्षे प्रवक्ता ही जबाबदारी अत्यंत यशस्वी रित्या पार पाडली. आपण ज्यावेळी एखादे झाड लावतो, त्यावेळी त्याच्याकडून फळाची अपेक्षा होणे सहाजिकच आहे. मात्र अमोल थोरातांनी पक्ष वाढसाठी आणि पक्ष संघटनेसाठी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. मात्र, त्यांनी कधीच कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. त्यंांनी स्वतःला झोकून देवून पक्ष संघटन उभे करून शहरात भारतीय जनता पक्षाचा पाया मजबुत केला. शहरातील तरूणांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते नेहमीची पुढाकार घेतला. शहरातील भाजप सदस्य नोंदणीचे ते प्रमुख म्हणून काम पाहिले आणि त्यांनी शहरातून मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करून घेतली. हे त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल.

राम- लक्ष्मण जोडीतील महत्त्वाचा दुवा…

भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मर्जीतील म्हणून देखिल त्यांची ओळख आहे. म्हणूनच त्यांना दादा आणि भाऊ यांना जोडणारा दुवा असे संबोधले जाते. अमोल थोरात हे भाजपाचे एकनिष्ठ आणि सच्चे कार्यकर्ते आहेत. शहरातील बुथ रचनेचे प्रमुख म्हणून देखिल त्यांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. त्यांच्याकडे एक तरूण नेतृत्व म्हणून पाहिले जाते. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची पध्दत यामुळे ते शहरातील जनमाणसांच्या हृदयात घर करून बसले आहे. त्यांनी दोन लोकसभा आणि दोन विधानसभा असे काम केले आणि त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून गेले. २०१९ च्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या समन्वयक म्हणून त्यांच्यावर पक्षांने टाकलेली जबाबदारी पार पाडून पुन्हा एकदा आपण पक्षाशी एकनिष्ट आहोत हे दाखवून दिले.

प्रशासनात दबदबा असलेला कार्यकर्ता…

महापालिकेतील कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नसतानाही प्रशासनावर अचूक पकड असलेला कार्यकर्ता अशीच अमोल थोरात यांची ओळख आहे. महापालिकेतील कोणत्याही विभागाच्या दालनात त्यांच्या नावाला विशेष आदर आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये असलेला संपर्क आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढण्याची वृत्ती यामुळे प्रशासनातील व्यक्तींकडून थोरात यांना कायम आदरभाव मिळतो. थोरात हे चुकीच्या कामांना विरोध आणि चांगल्या कामांचे नेहमीच कौतुक करतात. त्यांचा स्पष्टोक्तीपणा यामुळे ते आज संपुर्ण शहरात परिचित आहेत.

‘१०० पार’ चा नारा देणारा आत्मविश्वासू नेता..

राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपामध्ये अंतर्गत अस्वस्थता जाणवू लागली. त्यावेळी संघटन सरचिटणीस म्हणून अमोल  थोरात यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. पक्ष विरोधी बाकावर असतानाही आणि भाजपातील २५ ते ३० नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू असताना अमोथ थोरात यांनी ‘अब की बार १०० पार’ चा नारा दिला होता. कितीही प्रतिकूल परिस्थिती असताना संघटन प्रमुखाने खचून न जाता धिराने लढा कसा द्यावा? हेच थोरात यांनी दाखवून दिले. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिलेदार म्हणून आगामी काळात अमोल थोरात यांची वाटचाल यशस्वी होईल, यात शंका नाही.

राष्ट्र प्रथम… नंतर पक्ष आणि शेवटी स्वयं… या विचाराने कार्यरत असलेले श्री. अमोल थोरात यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.. !

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button