TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरीः चाकण येथे विक्रीसाठी आणलेला ३ लाखांचा गुटखा पकडला

चाकण : चाकण येथे विक्रीसाठी आणलेला सुमारे ३ लाख रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखूसह ११ लाख ५४ हजार ६०१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एक स्विफ्ट कार आणि दुचाकीचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक गिरिश चामले व पोलीस नाईक भोसुरे, पोलीस शिपाई समीर काळे, राजकुमार हनमंते, शशिकांत नांगरे हे चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंद्यावरिल कारवाईच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस शिपाई समीर काळे यांना त्यांचे बातमीदार कडून माहिती मिळाली की, आळंदी फाटा येथे फॅशन सलुन समोर पाच जण साठवणुक करून ठेवलेला गुटखा तसेच तंबाखू पोत्यात भरून विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत.

त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून संदिप उमा शंकर व्दिवेदी (वय २७ वर्षे, रा. कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे), मोहन रामनरेश गुप्ता (वय २१ वर्षे, रा.बलगा वस्ती, मेदनगरवाडी, चाकण ता.खेड जि.पुणे), लवकुश कमलेश लाक्षकार (वय २५ वर्षे, रा. आळंदी फाटा, ता.खेड जि.पुणे), सुमित विनोदकुमार इटोंदिया (वय २६ वर्षे, रा. रा. कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे), संतोष उमाशंकर व्दिवेदी (वय २८ वर्षे, रा. रा. कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे) यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर पुढील तपास केला असता कल्लु गुप्ता (रा. चाकण ता.खेड जि.पुणे) याच्या सांगण्यावरून संगनमत करुन पोत्यामध्ये वेगवेगळया कंपनीचा गुटखा व तंबाखु विक्रीकरीता साठवणुक करुन स्वीप्ट व मोटर सायकलवरती भरुन विक्री करीता घेवून जात असल्याचे सांगितले. तेथे शासनाने प्रतिबंधीत केलेला २ लाख ९४ हजार ६१० रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखु आणि स्विफ्ट कार, एक मोटर सायकल असा एकुण ११ लाख ५४ हजार ६१० रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान कल्लु गुप्ता याचा शोध घेत असून सदर आरोपींच्या विरुध्द चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार सचिन मोरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, शशिकांत नांगरे, समीर काळे, रामदास मेरगळ, महेश भालचिम, निखिल फापाळे, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button