breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

PCMC | तीन सदस्यीय पद्धतीने होणार पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. २००२ साली याच पद्धतीने निवडणूक पार पडली होती. यानंतर वार्ड पद्धती आली. तसेच मागील निवडणूक प्रभाग पद्धतीने पार पडली. यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड मनपामध्ये भाजपचे कमळ फुलले होते. राष्ट्रवादीचा एकहाती असणाऱ्या बालेकिल्ल्याला भाजपने भगदाड पाडले.

२००२ साली तीन सदस्यीय पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. तर काँग्रेसकडे विरोधी पक्षाची जबाबदारी होती. यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये कायम अजित पवार यांचे निकटवर्तीय महापौर पदाच्या खुर्चीवर बसत होते. २०१४ मध्ये देशात मोदी सरकार आल्यानंतर मोदी लाटेचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायला मिळाले. यानंतर पुण्यातील सूत्र राष्ट्रवादीकडून भाजपकडे गेली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीतही पुण्यातील ८ जागांवर भाजपाचे आमदार निवडून आले. याआधी पिंपरी-चिंचवड आणि पुणे मनपामध्ये सत्तापालट होऊन भाजपचे महापौर खुर्चीवर बसले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button