TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पर्यावरण प्रेमींची ‘ऑक्सिजन फॅक्टरी’

मल्हारगडावर १२१ झाडांचे रोपण : एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प

पिंपरी: पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील कामगार डॉक्टर, अभियंते, पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे स्थापन केला. मल्हार गड सेवा समिती विठ्ठलवाडी देहू यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद यांची जयंती आणि अधिक मासातील रविवार निमित्ताने देहू परिसरातील मल्हार गडावर 121 देशी झाडांचे वृक्षारोपण करुन खरोखरच एक ऑक्सिजन फॅक्टरीचे ओपनिंग मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले.

सकाळी 7.30 वा. मल्हार गडावर साधारण 225 सदस्यांनी हिंदू संस्कार आणि संस्कृती परंपरेनुसार देहू गावचे कुल दैवत शिव मल्हार, कालभैरवाची मनोभावे तळी भरुन वृक्षारोपणास सुरुवात केली. एकुणच 121 देशी वड, पिंपळ, कडू लिंबाची झाडे लावली.

देहू गावातील मल्हार गडावर मागील 9 वर्षांपासून देशी झाडांचे वृक्षारोपण करुन आज मितीला नावा रुपाला आणन्याचे काम वृक्ष मित्र, निसर्ग प्रेमी सोमनाथ आबा मुसगूडे यांनी केले आहे. पुणे महामार्गवर मोठ्या प्रमाणात दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली. त्या झाडांच्या फांद्या या डोंगरावर लावुन आज रोजी मोठ्या वृक्षात रुपांतर झाल्याचे येथे दिसते. डोंगरावर आज मितीला एक लाख लिटर पाणी क्षमता असणारे तळे निर्माण करुन लावलेली झाडे 100 टक्के बहरली आहेत. त्याच बरोबर शिव मल्हार सेवा समितीच्या वतीने गडावर कालभैरव मंदिर उभे करण्याचे काम चालू आहे.

आपल्या परिवारातील 108 कुंटूबीयानीं उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सातत्याने तिसर्या वर्षी 121 देशी झाडांचे वृक्षारोपण करत तिर्थक्षेत्र देहू या आध्यात्मिक, निसर्ग रम्य परिसरात एक लाख झाडे वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला देहू देवस्थान अध्यक्ष ह.भ.प.पुरुषोत्म महाराज मोरे, नगरसेवक मयूर शिवशरण, नगरसेविका पुजा दिवटे, दत्तात्रय जाधव अनेक निसर्ग प्रेमी संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपला परिवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.आर. शिंदे यांनी सोमनाथ आबा यांना त्यांच्या कामाचा गौरव करत शॉल व जास्वंदीचे रोप देऊन सत्कार केला. या उपक्रमासाठी अनिल शर्मा, विजय शिर्के, यशवंत महाजन, अजित भालेराव, दिपक मराठे, वामनराव आवटी, किरण कांबळे, महंमदशरीफ मुलाणी, दत्तात्रय कुंभार यांनी पुढाकार घेतला.
प्लास्टिकमुक्त भारत… जनजागृती
आपला परिवार सातत्याने मागील सहा वर्षांपासून समाजाभिमुख काम करत असून वर्षभरात मकरसंक्रांत, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि एक हात मदतीचा हे उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मागिल वर्षी आपल्या देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना 15 ऑगस्ट 2022 रोजी पुर्ण पुणे शहरात एक तासात 10,000 कापडी पिशव्या मोफत वाटून “प्लास्टिक मुक्त भारत देश माझा” करण्यासाठी एक लाख लोकांपर्यंत जनजागृती करण्यात यश मिळाले असे संस्थेचे सेक्रेटरी अजित भालेराव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button