breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

आपली युती म्हणजे पांडवाची फळी आणि आघाडी म्हणजे…; पालघरच्या सभेतून देवेंद्र फडणवीसांचा शाब्दिक वार

पालघर : डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर सभा झाली. पालघरच्या डहाणूमध्ये ही सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. नरेंद्र मोदीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी , मनसे , शिवसेना आहे. एक मोठी पांडवाची फळी आपण तयार केलीय… दुसरीकडे राहुल गांधी पक्षांची एक खिचडी आहे. आमचं सरकार येणार, असं म्हणताना सकाळी 9 वाजता पोपटलाल टीव्हीवर दिसतात.संगीत खुर्ची आपण खेळायचो. पहिला बसला तो पहिला पंतप्रधान… पंतप्रधान पद ही तुमचा मालमत्ता नाही. या देशाचा पंतप्रधान निवडण्याची ही निवडणूक आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

पालघरच्या डहाणूमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला उपस्थित होते. भाजपचे पालघर लोकसभेचे उमेदवार हेमंत सावरा यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवींद्र चव्हाणदेखील उपस्थित होते. या मेळाव्यात फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित केलं.

हेही वाचा    –      ‘महाराष्ट्रात निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी दोन हजार कोटींचं वाटप’; रोहित पवारांचा गंभीर आरोप 

ठाकरे गटावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. मासेमारी बंदी येणार असं खोट सांगितलं जातं. मासेमारी वाढवण्याचं काम आम्ही करणार आहोत. मासेमार कागदपत्र तयार केले जात आहेत. 70 वर्षावरील सगळे उपचार मोफत केलेलं आहेत. एकही पैसा खर्च करण्याची गरज पडणार नाही. मोदीजीचं कार्ड सर्व रूग्णालयात कार्ड चालणार आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम करताहेत, असं विधानही देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

किनारपट्टीचा आराखडा तयार होत नव्हता. सीआरझेडचे आराखडे मंजुर होवून येत आहेत. नवीन डीसीपीआर लागू होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत काँप्रोमाइस करायचं नाही. कोविडचा काळ आठवा घराच्या सोबत बोलू शकतं नव्हतो. नरेंद्र मोदीजींनी कोविडची लस तयार करून घेतली. प्रत्येक नागरिकाला दोन वेळा लस मिळाली, असंही ते म्हणाले.

हेमंत सावरासारखा चांगला उमेदवार दिलेला आहे. सगळ्या राज्यात अनेक खासदारांना राज्यात काम दिलं. कमळाचं बटण दाबल की वोट त्यांना मिळेल. मोदीजीना आशीर्वाद देण्य़ासाठी कमळाचं बटण दाबा, असं आवाहनही देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button