एकच कॉल, प्रॉब्लेम सॉल्व… राहुल कलाटे यांच्या विश्वासार्ह्यतेमुळे प्रचार रॅलीत नागरिकांचा वाढता सहभाग
![One Call, Problem Solved… Rahul Kalate's Credibility Increases Citizen Participation in Campaign Rallies](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Rahul-kalate-2-1-780x470.jpg)
चिंचवड ः चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराचा झंझावात पहायला मिळत आहे. कोणत्याही समस्येप्रसंगी राहुल कलाटे हजर राहून तसेच संबंधित व्यवस्थेशी संपर्क करून कोणतीही समस्या तत्परतेने निवारण करण्यास सहाय्य करत असल्यामुळे एकच कॉल… प्रॉब्लेम सॉल्व अशी चिंचवड विधानसभा मतदार संघात राहुल कलाटे यांची प्रतिमा बनल्यामुळे तसेच त्यांच्या विश्वासार्ह्यतेमुळे प्रचार रॅलीत नागरिकांचा वाढता सहभाग पहायला मिळत आहे. प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांची एकच धारणा पहायला मिळत आहे ती म्हणजे मदत मागणारा कोण,कुठला आहे, मतदार संघात आहे की नाही हे न पाहता जे जे शक्य आहे ती मदत करणारा दाता म्हणजे राहुलदादा कलाटे……चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राहूल दादा यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निश्चय या प्रचारकांनी केला आहे. वाकड गावठाण येथे म्हातोबा मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्ते, हितचिंतकांच्या उपस्थितीत कलाटे यांनी विजयाचा निर्धार केला.
यावेळी कलाटे यांच्याबद्दल सांगताना चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतदार म्हणाले की, मागच्या निवडणूक वेळेस, कोणताही बॅनर नव्हता, एवढेच काय तर स्वर्गीय लक्ष्मण भाऊ यांच्या विरोधात कोणी पुढे देखील आले नाही. फक्त १ च व्यक्ती राहुल दादा कलाटे उभे राहिले आणि ते पण अपक्ष… यावेळी मात्र परिस्थिती उलट आहे. राहुल कलाटे यांना दोन्ही उमेदवार हे राहुल दादांना घाबरुन गेले आहेत.