ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मनसेच्या वतीने दहावी, बारावी विद्यार्थी, आदर्श शाळा व आदर्श शिक्षकांचा सत्कार

मुलांनी स्वतःच्या व्यवसायाकडेही लक्ष द्यावे - किशोर शिंदे

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेतील प्रत्येक प्रभागातील ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या ४५० गुणवंत विद्यार्थ्यांचा, शहरातील आदर्श १० शाळा व तिन्ही विधानसभेतील १० आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शहरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन सचिन ढोबळे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रभारी व मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस किशोर शिंदे, गणेश आप्पा सातपुते, रणजीत शिरोळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष बाळा दानवले यांनी केले. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी कसे राहिले पाहिजे आपल्या वडीलधाऱ्यांची, शिक्षकांची आदराने वागून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावरती आपण एक एक पायरी सर करावी तसेच यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम व चिकाटी अंगा घ्यावी लागते. येणाऱ्या काळामध्ये मुलांनी स्वावलंबी होऊन नुसतं शिक्षणच न घेता स्वतःच्या व्यवसायाकडेही लक्ष द्यावे. स्वतः मालक होऊन कंपनी मालक होऊन अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रयत्न करावा, अशा प्रकारचे मार्गदर्शन किशोर शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

हेही वाचा – ‘अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’; काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

गणेश सातपुते यांनी मनसेने वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलन व विद्यार्थ्यांचे सोडवलेल्या प्रश्नांची व कामांचा उल्लेख करून शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कसे वागले पाहिजे, पालकांनी विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधला पाहिजे व कोणताही निर्णय विद्यार्थ्यांवरती मुलांवरती लादू नये. विद्यार्थ्यांनी आपले करिअर कसे निवडावे यावरती मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मानले. या कार्यक्रमाला विशाल मानकरी, राजू साळवे, रुपेश पटेकर, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, सचिन शिंगाडे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, जयसिंग भाट, नाथा शिंदे, सुशांत साळवी, नितीन चव्हाण, भागवत नागपुरे, प्रवीण माळी, सत्यम पात्रे, परमेश्वर चिल्लरघे, राजू भालेराव, सुधीर जम, स्वप्निल भोसले, एलएक्स मोजेस, सुरेश सकट, मंगेश भालेकर, आदिती चावरिया, श्रद्धा देशमुख, विद्या कुलकर्णी, वैशाली बोत्रे, आकाश सागरे, मिलिंद सोनवणे, शिशिर महाबळेश्वर, निशिगंध सोनकांबळे, दिनेश कापसे, कैलास दुर्गे, सचिन मीर, इत्यादी मनसे पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button