breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण
ओबीसी आरक्षण : पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात कडेकोट बंदोबस्त
![OBC Reservation: Dr. Pimpri. Tight security at Ambedkar Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/c7f6a155-ce4c-4fd2-bbc8-6a92b29e4fef.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
‘ओबीसी’ आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या चक्का जाम आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. पुण्यातील शाहु कॉलेज येथे छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आंदोलनाला सुरूवात होणार आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.