Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही, फक्त…”; शिंदेंसोबतच्या दुराव्याच्या चर्चांवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

Devendra Fadnavis :   मागील काही दिवसांपासून महायुतीत काही तरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडल्याचे देखील म्हंटले गेले. याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नाराजीच्या चर्चेत आणखी भर पडली. मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देत फडणवीस यांनी आमच्या दोघात कुठलाही दुरावा नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, “आमच्या दोघात कोणताही दुरावा नाही, आम्ही आज आणि काल व त्यापूर्वीही परस्परांशी बोलले, एकत्र कार्यक्रमात सहभागी झालो होतो. एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही. फक्त माध्यमांनी तसे चित्र निर्माण केले आहे. हा वेड्यांचा बाजार सुरु आहे आणि यामध्ये काही माध्यमे वेडी झाली आहेत.”

“काही फुटेज दाखवून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण ते तोंडावर पडल्या शिवाय राहणार नाही. परवा जेव्हा मी आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी हुतात्मा स्मारकावर गेलो तेव्हा आल्यावर आणि जाताना आम्ही भेटलो. ते कुठे जातायत हे त्यांनी सांगितले आणि मी कुठे जातोय हे त्यांना सांगितले. त्यातून काही गोष्टी क्लिक करुन बोललो नाही असं दाखवलं गेलं. कालच्याही कार्यक्रमात आमच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याचे ठरले होते. तिथे आल्यावर, स्टेजवर आणि जातानाही आम्ही भेटलो,” असे स्पष्टीकरण यावेळी फडणवीसांंनी दिले.

हेही वाचा –  ‘रेकॉर्ड ब्रेक’’ गर्दी : तब्बल 79 हजार पर्यावरण प्रेमींच्या साक्षीने ऐतिहासिक ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मित्रपक्षांमध्येच सुरू असलेल्या नेत्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाची तक्रार केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा आल्याचे म्हटलं जात होतं. बिहारच्या शपथविधीच्या कार्यक्रमादरम्यानही या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून त्यांच्यातील नाराजी उघडपणे दिसून आली.

दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न केल्याने, महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळील एका कार्यक्रमातही शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना अभिवादन केले आणि लगेच दोघेही बाजूला झाले. मात्र सततच्या या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button