‘राऊतांचं १० मिनिटे संरक्षण काढा ते उद्या सकाळी दिसणार नाहीत’; नितेश राणे
![Nitesh Rane said that remove Sanjay Rauta's protection for 10 minutes, he will not be seen tomorrow morning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/sanjay-raut-and-nitesh-rane-780x470.jpg)
संजय राऊतांनी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या मुद्यावरून आज विधानसभेतही मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याचं बघायला मिळत आहे. यावेळी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्शसंकल्पीय अधिवेशनात संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. ते सामनात येण्याआधी त्यांचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं. शिवसेनेच्या विरोधात लिहिलेलं.
बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही, असं राऊतांनी लिहिलं होतं. राऊतांना दिलेलं संरक्षण काढा. पोलिसांचं संरक्षण घेऊन ते फिरतात. ते सरकारने दिलेलं संरक्षण आहे. त्यांनी मार्मिकमध्ये छापलेलं कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचं १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे.