संजय राऊतांना आलेल्या धमकीवरून नितेश राणे यांची जोरदार टीका; म्हणाले, मच्छर मारण्यासाठी..
![Nitesh Rane said that no threat is needed to kill mosquitoes](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/sanjay-raut-and-nitesh-rane-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची आणि आमच्या भूमीका आसो किंवा त्यांचे काही विचार आम्हाला पटत नसतील तरीही आमच्या राज्यामध्ये कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आमचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. शेवटी काय हे उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचे सरकार नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली.
हेही वाचा – Pune : ज्ञानेश्वरीतील १२ अध्याय यावर साकारणार ‘संत ज्ञानेश्वर सृष्टी’
शरद पवार यांची संपुर्ण काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेताय आता मच्छर मारण्यासाठी कोणाला धमकी देण्याची गरज नाही. तो काय पायाच्या खालती पण थोटा बुट हालवला तरी तो मरतो. त्यांचा भाऊ सुनील राऊत यांना विचारा नेमकी धमकी कोणाकडून आली. मुंबईतील एक डॉक्टर महिला संजय राऊत यांच्या जीवाच्या मागे पडलेली आहे. कदाचित तिच्याकडून तर धमकी नाही ना, याचं उत्तर संजय राऊत आणि सुनिल राऊत यांनी द्यावं, असंही नितेश राणे म्हणाले.