breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘..म्हणून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं’; नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे षडयंत्र रचत होते

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रूग्णालयाच्या एका खोलीत बैठकाही घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी होते. ते रूग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पाहात होते. षडयंत्र रचत होते. माझे वडील आजारी आहेत. आता ते बरे होणार नाहीत असं आदित्य ठाकरे सांगायचे. त्यासाठी जसलोक रूग्णालयात बैठका झाल्या. जसलोकच्या कोणत्या रूममध्ये बैठका होत होत्या हे मी सांगू शकतो. सीसीटीव्ही फुटेज देऊ शकतो. महाविकास आघाडीच्य नेत्यांनी विरोध केला म्हणून ते प्रकरण थांबलं, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button