राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही मंत्रिपद नाही?, तटकरेंच्या निवासस्थानी खलबतं, बैठकीसाठी फडणवीस तातडीने दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-2024-06-09T130727.585-780x470.jpg)
Ajit Pawar News : देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होत आहे. रविवारी सायंकाळी शपथविधी होत असून अनेकांची नावं मंत्रिपदासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल यांचं नाव शुक्रवारपासून पुढे येत होतं. परंतु आता त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची शक्यता आहे.
एनडीएमधील घटकपक्षांना भाजप सन्मानाने संधी देणार असल्याचं स्पष्ट असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मात्र एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदासाठी फोन आलेली नाही,
दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी खलबतं सुरु आहेत. दिल्लीत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची बैठक सुरु असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे.
हेही वाचा – मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात दिसणार रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना पक्षनेतृत्वाचा फोन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीमध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित आहेत. अजित पवार गट वेटिंगवर असल्याने फडणवीसांनी तातडीने तटकरेंच्या निवासस्थानी दाखल होत चर्चा सुरु केली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने चार अधिक एक अशा पाच जागांवर निवडून लढवली होती. परंतु केवळ एका जागेवर पक्षाचा विजय झाला. रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यामुळेच कदाचित भाजपकडून त्यांना मंत्रिपद नाकारलं जातंय. तरीही सायंकाळपर्यंत अनेक मोठे बदल होऊ शकतात, असं सांगितलं जातंय.