नवाब मलिकांना अखेर जामीन मंजूर, सुप्रिम कोर्टाचा दिलासा
![Nawab Malik finally granted bail, relief from Supreme Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Nawab-Malik-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सप्रिम कोर्टाने दिलासा दिला आहे. तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणावरून त्यांना जामीन मिळाला आहे. ते फेब्रुवारी २०२२ पासून नवाब मलिक कारागृहात आहे.
नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी मलिकांनी आधी हायकोर्टाकडे जामीनाची मागणी केली होती. त्यावेळी ईडीनं जोरदार विरोध केला होता. मात्र आज सुप्रीम कोर्टात ईडीने कोणताही विरोध केला नाही.
हेही वाचा – प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी! पालकमंत्र्यांचे आवाहन
नेमकं काय आहे प्रकरण?
नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबईती कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना ताब्यात घेण्यात आलं. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने धाडसत्र राबवले होतं.