‘हिंदूत्व हाच श्वास..धर्म रक्षणाची आस..’; नवनीत राणांचे बॅनर्स चर्चेत!
नवनीत राणांचा बॅनरवर 'हिंदू शेरनी' असा उल्लेख
![Navneet Rana is mentioned as Hindu Lioness on the banner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Navneet-rana-780x470.jpg)
मुंबई : ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे यासाठी अनेक ठिकाणी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा पठनासाठी राणा दाम्पत्याने केलेलं आंदोलन, यासाठी भोगलेला १४ दिवसांचा वनवास या सगळ्याची आठवण करून देणारे मोठे बॅनर मुंबईत लावले आहेत. विशेष म्हणजे नवनीत राणा यांचा या बॅनरवर हिंदू शेरनी असा उल्लेख करण्यात आला आहे. भगवी शाल पांघरलेला नवनीत राणा यांचा हा फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यातर्फे अमरावतीत येत्या हनुमान जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ एप्रिल रोजी अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. या कार्यक्रामाचे बॅनर्स मुंबईत लावण्यात आले आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/image-27.png)