breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘टीएमसीचा अर्थ तू, मी आणि करप्शन’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

Narendra Modi | पश्चिम बंगालमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेस पक्षाचे इंग्रजीतील छोटे स्वरुप टीएमसी असे आहे. या नावावरून पंतप्रधान मोदींनी टीकास्र सोडले. टीएमसीचा अर्थ तू, मी आणि करप्शन, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या काळात पश्चिम बंगालची अधोगती झाली. प्रत्येक योजनेत याठिकाणी भ्रष्टाचार दिसतो. केंद्राच्या योजनांनाही टीएमसी सरकार स्वतःचे स्टिकर लावून खपवते. गरीबांचा अधिकार हिरावून घेण्यात या सरकारला काहीच कमीपणा वाटत नाही. अत्याचार आणि छळाचे दुसरे नावच आता टीएमसी असे घेतले जाते. टीएमसीसाठी बंगालचा विकास ही प्राथमिकता नसून भ्रष्टाचार, घराणेशाही आणि छळवाद हेच त्यांचे महत्त्वाचे काम राहिले आहे. बंगालच्या जनतेने गरीब राहावे, असा टीएमसीचा प्रयत्न आहे. जेणेकरून त्यांचा राजकारणाचा खेळ असाच सुरू राहिल.

हेही वाचा      –      उन्हाळ्यात थंड पाणी पिताय तर वेळीच सावध व्हा! होऊ शकतं मोठं नुकसान 

बंगालमधील गुन्हेगारांना कधी अटक करायचे, हे बंगालचे पोलीस ठरवू शकत नाहीत, इथे गुन्हेगार ठरवितात की त्यांच्याबरोबर काय होणार. मी संदेशखालीमधील महिलांचे अभिनंदन करू इच्छितो की, त्यांनी न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर येऊन निदर्शने केली. छळ, हिंसाचार आणि अत्याचाराविरोधात त्यांनी आवाज उचलल्यामुळेच शाहजहान शेखची अटक होऊ शकली, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button