Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

Ladki Bahin Yojana | ‘२१०० रूपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही’; मंत्री नरहरी झिरवळ यांचं मोठं विधान

Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने ‘मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन देऊन मोठी स्वप्नं दाखवली होती. मात्र, महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. याकडे राज्यातील लाखो महिलांचं लक्ष लागलेलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि राज्यमंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलं आहे.

मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, की लाडक्या बहि‍णी नाराज आहेत, हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचं कोणीही जाहीर केलेलं नाही.

हेही वाचा   :    चिंचवड प्रवासी संघातर्फे पहेलगामच्या मृतांना चिंचवड रेल्वे स्थानकात श्रद्धांजली

विरोधकांनी आधी म्हटलं की महायुती लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे १५०० रुपये देण्याची ऐपत नाही अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी म्हटलं की २१०० रुपये देणार आणि मग १५०० रुपये दिले नाहीत तर २१०० कसे देणार? अशी टीका केली. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले तर आता २१०० रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार नाही. लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असं नरहरी झिरवळ म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button