पराभवानंतर नाना काटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,..त्यांनी पैसे वाटले
राहुल कलाटे यांच्या बंडखोरीची फटका नक्कीच बसला
पिंपरी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या विजयी झाल्या. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना आपला पराभव पत्कारावा लागला आहे.
नाना काटे यांनी पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो पण बंडखोरीची फटका नक्कीच बसला आहे. कारण कलाटेंना झालेलं मतदान हे माविआचंच आहे. त्यातली काही मतं वंचित बहुजन आघाडीची असू शकतील.
मतदान होण्याच्या दोन दिवस आधी सत्ताधाऱ्यांनी आमचे बरेच कार्यकर्ते संपूर्ण चिंचवड मतदारसंघात पुन्हा काम करतील आणि आम्ही जोमानं काम करू. सहानुभूती असती तर पैसे वाटलेच नसते. त्यांना पराभवाची भीती होती म्हणून त्यांनी पैसे वाटले, असं नाना काटे यांनी म्हटलं आहे.