breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

मुश्रीफांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार आज उघड करणार – सोमय्या

पुणे – शेल कंपन्यांच्या माध्यमातून तसेच साखर कारखान्यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा निशाणा धरला आहे. मंगळवारी (ता. 27) मुश्रीफ यांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार उघड करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची माया कमावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्या संदर्भात पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. त्याआधी सोमय्या यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्यात घोटाळ्या झाल्याचा आरोप करुन त्यासंदर्भातील मुश्रीफ यांच्याविरोधात कागदपत्रे ईडीकडे दिली होती. त्यानंतर त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र सादर केली. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा अर्थिक घोटाळा केला आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

सोमय्या यांनी सोमवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मंगळवारी मी कोल्हापूरला जाणार असून तिथे मुश्रीफ यांचा तिसरा आर्थिक गैरव्यवहार उघड करणार आहे. त्यानंतर त्यांनी केलेल्या तिन्ही गैरव्यवहाराबाबत तक्रार दाखल करणार आहे.

मंत्र्यांचा आजारी होण्याचा पॅटर्न :

अगोदर मी घोटाळा काढला की मंत्री गायब व्हायचे. अनेकांच्या बाबतीत हे घडले आहे. आता मात्र लगेच दवाखान्यात भरती होतात. घोटाळा बाहेर आला की मंत्र्यांचा आजारी होण्याचा पॅटर्न दिसून येतो. मुश्रीफ यांचा तिसरा गैरव्यवहार उघड केल्यानंतर राज्यातील 12 मंत्री अडचणीत येणार आहे. त्यामुळे हे 12 मंत्री घोटाळा उघड होताच दवाखान्यात दाखल होणार का? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.

हल्ला करणारे नेमके कोण होते? :

कोल्हापूरला येण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्यावर घातलेली बंदी उठवली आहे. मुळात अशा बंदीला मी भीक घालत नाही. कारण ही बंदीच बेकायदेशीर होती. माझ्यावर हल्ला होणार होता हे जर राज्य सरकारला माहिती होते तर त्यांनी काय कारवाई केली, हे स्पष्ट करावे. याबाबत मी केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, राज्याच्या गृह विभागाकडून त्यांना कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मग हे हल्ला करणारे नेमके कोण होते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असे सोमय्या म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button