breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण
मुरलीधर मोहोळ आज दाखल करणार उमेदवारी अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-1-4-780x470.jpg)
पिंपरी : मुरलीधर मोहोळ यांच्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हेही वाचा – श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ तारखेला संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे.मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.