चिंचवडगावात महापालिका बांधणार नवीन पाण्याची टाकी
पिंपरी |
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडगावात प्रभाग क्र.१८ नवीन उंच पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. या कामासाठी ३ कोटी ११ लाख रुपये खर्च होणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. यासाठी ३ कोटी ५८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टिंग शुल्क वगळून ३ कोटी ५५ लाख रुपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.
त्यापैकी जे. डी. खानदेशे या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा १३.५ टके कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच ३ कोटी ९ लाख ३ रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस ९७ हजार आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेसपोटी १ लाख ४६ हजार रुपये असे एकूण ३ कोटी ११ लाख रुपये खर्च होणार आहेत. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवडगावातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.