राज्य सरकारची मोठी घोषणा, कोस्टल रोड छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार
![Mumbai's coastal road will be named after Chhatrapati Sambhaji Maharaj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Coastal-Road-780x470.jpg)
मुंबई | गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणारा मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सागरी किनाऱ्याच्या पहिल्या टप्प्याच्या एका लेनचं उद्घाटन करण्यात आलं. हा सागरी किनारा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
१९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबई सागली किनाऱ्याचं उद्घघाटन केलं जाईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, त्या वेळी हा मुहूर्त चुकला. २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये मोदी एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांच्याहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं जाईल, अशीही चर्चा पाहायला मळाली. मात्र, तेव्हाही हे उद्घाटन होऊ शकलं नाही. अखेर आज या सागरी मार्गाच्या एका लेनचं उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘ईडिकडून केवळ विरोधी नेत्यांची चौकशी’; शरद पवारांची टीका
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मार्गिका (अंशतः) चे लोकार्पण आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis , उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत… pic.twitter.com/pddAaTqIWd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2024
मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या टप्प्यावरील एका लेनचं उद्धाटन करण्यात आलं आहे. सागरी मार्गाची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. त्यापैकी ९ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे.