उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस
![Mumbai Police Notice to Urfi Javed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/chitra-wagh-and-urfi-javed-780x470.jpg)
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांकडून दखल
मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री उऱ्फी जावेद तिच्या चित्र विचित्र फॅशन कपड्यामुळे कायम चर्चेत असते. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघी एकमेकींवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस बजावली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात होणार उर्फी जावेदची चौकशी होणार आहे.
उर्फीला आजच हजर होण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उर्फी जावेदच्या या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीमुळे उर्फी जावेदच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आता उर्फी काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सोबतच, उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसात तक्रार केली आहेच. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.