ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुकेश खन्नांचा ‘पठाण’ वर निशाणा, हे गाणं सेंसॉर बोर्डाने कसं पास केल…

मुंबई ः बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सेंसॉर बोर्डा

काय म्हणाले मुकेश खन्ना?
मुकेश खन्ना यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटावर निशाण साधला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, “मला वाटतं की, आपली चित्रपटसृष्टी बिघडली आहे. ही एक अश्लीलता आहे. याचा कोणत्याही धर्मासोबत काहीही घेणं-देणं नाही. सेंसॉर बोर्ड सुप्रिम कोर्ट नाही. तिथे खूप प्रतिष्ठित व्यक्ती बसल्या आहेत, परंतु त्यांना हिंदू धर्मावर होणारे हल्ले दिसत नाहीत. आपला देश स्वीडन किंवा स्पेन नाही. तिथे या सर्व गोष्टींना बंधन नाही. लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान केले आहेत पुढच्या वेळी त्यांना विवस्त्र घेऊन या, कोणच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत हे चित्रपट सेंसर बोर्डचे काम हे आहे. सेंसॉर बोर्डने असे चित्रपट दूर करायला हवे. हे गाणं मानसिकता खराब करु शकते. हे गाणं ओटीटीसाठी नाही तर चित्रपटासाठी बनवण्यात आलं होतं. हे गाणं सेंसॉर बोर्डाने कसं पास केलं. त्यांनी देखील हे मुद्दाम केलं का?”

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button