breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण
खासदारांना हिवाळी अधिवेशनात ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’ घोषणाबाजी करता येणार नाही!
![MPs cannot raise Jai Hind, Vande Mataram slogans in the winter session](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Parliament-Winter-Session-2023-780x470.jpg)
Parliament Winter Session 2023 : संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ४ डिसेंबरपासून सुरु होत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सचिवालयाकडून खासदारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहे. सचिवालयाने खासदारांना संसदीय प्रथा, परंपरा आणि आचारसंहितेचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सभागृहात ‘धन्यवाद’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’, थँक्यू, थँक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी करू नये अशा सूचना राज्यसभा सचिवालयाने दिल्या आहेत.
सचिवालयाने काय सूचना दिल्यात?
- सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखावी.
- सभागृहात ‘धन्यवाद’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’, थँक्यू, थँक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी करू नये.
हेही वाचा – ‘प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करून अटक करा’; नारायण राणे यांचं मोठं विधान
- सभागृहात अध्यक्षांनी केलेल्या आदेशाचे पालन केले जावे.
- सभागृहात किंवा बाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राज्यसभा किंवा लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करू नये.
- प्रत्येक सदस्याने सभागृहात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना अध्यक्षांना नमस्कार करावा.
- प्रत्येक सदस्याने कामकाजात व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीने सभागृहात प्रवेश करावा.
- सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल या प्रकारे सदस्यांनी आपापसात बोलू नये.
- सदस्यांनी भाषण संपल्यानंतर लगेच सभागृहाबाहेर पडू नये.
- विषय मांडण्यासाठी दिलेली नोटीस कोणत्याही सदस्याने मान्य होईपर्यंत प्रसिद्ध करू नये.