“फडणवीसांनी एक लवगी बॉम्ब जरी फोडला तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आतमध्ये दिसतील”; नवनीत राणा
![MP Navneet Rana said that even if Fadnavis explodes a single bomb, Uddhav Thackeray and Aditya Thackeray will be seen inside.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/navneet-rana-780x470.jpg)
चाळीस आमदार गेले हाच मोठा बॉम्ब फुटला
नागपूर :
देवेंद्र फडणवीसांना सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहेत, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर एक लवगी बॉम्ब जरी फोडला ना तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्याला आतमध्ये दिसतील, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस बॉम्ब सांगत नाहीत आणि ते बोलत पण नाहीत म्हणुन नाही तर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आतमध्ये दिसतील त्यामुळे जे सकाळ झाल्यावर बॉम्ब फोडण्याची भाषा करतात त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे पहिल्यांदा नागपूरमध्ये अधिवेनासाठी आले. त्यांनी विदर्भातील दहा मोठी कामे दाखवून द्यावीत. माझी पाच वर्षाचा पगार संजय राऊतांना देईन. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना एकही प्रपोजल पाठ नसेल असं नसेल मात्र उद्धव ठाकरेंना एकही काम असं नसल की आपण त्या कामाचं उदघाटन केलं आहे, असंही खासदाप र नवनीत राणा म्हणाल्या.
सोबतच, संजय राऊत यांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये. त्यांचे आधीच चाळीस आमदार गेले हाच बॉम्ब फुटला आहे. आम्ही जर बॉम्ब फोडला तर संजय राऊत, उद्धव ठाकरे सुद्धा दिसणार नाहीत, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे दाखवावं मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बक्षिस देईन असं खुलं आव्हान देखील राणा यांनी दिलं आहे.