breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा महापालिकेच्या कारभारावर ‘वॉच’
![MP Dr. Amol Kolhe's 'watch' on NMC's affairs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/WhatsApp-Image-2021-10-20-at-3.35.43-PM-1.jpeg)
पिंपरी |
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली तरी विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.
त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या होत असलेल्या आजच्या ऑफलाइन सर्वसाधारण सभेला शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अचानक हजेरी लावली. नागरिकांच्या कक्षात बसून सभागृहात पक्षाचे नगरसेवक विरोधात बोलतात की नाही यावर ‘वॉच’ ठेवत आहेत.