breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३टेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव; राज ठाकरेंसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यात दिवाळी सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. अनेकांच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि नवी स्वप्न घेऊन येणारा हा सण महाराष्ट्रातही तितक्याच जल्लोषात साजरा होतो. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. मनसेच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क परिसर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाच्या माध्यमातून लख्ख दिव्यांनी उजळून टाकला जातो. यंदाही मनसेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र दिसणार आहे.

दरवर्षी मनसेच्या वतीने दिवाळी निमित्त दादर शिवाजी पार्क परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या कार्यक्रमाचा शुभारंभ 21 ऑक्टोबर म्हणजे आज होणार आहे. या कार्यक्रमास राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या कार्यक्रमाबाबत राज ठाकरे यांची स्वाक्षरी असलेले पत्र शिवाजी पार्क, दादर परिसरात मनसेच्या वतीने वाटण्यात आले आहे.

या पत्रात मनसेच्यापदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाला मुंबईतील सर्व विभाग अध्यक्ष तसेच शाखा अध्यक्ष, महिला-पुरुष पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिकांनाही कुटुंबासह या दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच दिवाळीनिमित्त सर्वांनी आपलं घर, अंगण रोषणाईने उजळून टाकावे असेही सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button