breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर मनसेचा बहिष्कार

पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण करण्याची मागणी

पिंपरी ! प्रतिनिधी

पुणे वनाज ते पिंपरीपर्यंत मेट्रो धावणार असून 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. मात्र पिंपरी चिंचवडला त्याचा नेमका फायदा काय ? असा सवाल करत शहर मनसेने पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. पिपंरी ते निगडीपर्यंत मेट्रो झाल्यास त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे , अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी केली आहे.

या बाबत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. या वेळी मनसे शहर सचिव रुपेश पटेकर, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, माथाडी अध्यक्ष सचिन शिगाडे, किरण गवळी आदीसह मनसेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसापासुन पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने देखील वेळोवेळी आंदोलन करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील कामगार वर्ग, महिला वर्ग , विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे शहरात विविध कामासाठी, शिक्षणासाठी पुणे शहरात जातात. परंतु हा मेट्रोमार्ग अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

महामेट्रोने पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रोमार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. राज्य शासनाने सदरील अहवाल गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. सद्यस्थितीत सदरील प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुढील प्रक्रियेचा आवश्यक तो पाठपुरावा करून त्वरित मेट्रो मार्ग निगडीपर्यंत सुरू करावा.

तसेच पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रोमार्गिका कधीपर्यंत सुरु होणार? सदर प्रकल्प एवढ्या दिवसापासून प्रलंबित असण्याचे कारण काय आहे ? सदर प्रकल्पासंदर्भात आपण वेळोवेळी राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे तपशील. थोड्याच काळापूर्वी राज्य शासनाचे तसेच केंद्र शासनाचे आर्थिक अंदाजपत्रक जाहीर झालेले असून त्यामध्ये महामेट्रोसाठी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीबद्दल तपशील देण्याची मागणी चिखले यांनी केली. यावेळी मेट्रोचे काम निगडीपर्यंत लवकर सुरू करून त्याचा पाठपुरावा करू, असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button